ॐ नमः शिवाय

सत्संग

सत्संग = सत् + संग
सत् म्हणजे सत्य 
संग म्हणजे सहवासात 

सत्संग म्हणजे ज्यांनी सत्य जाणले आहे त्यांच्या सहवासात राहणे. ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आहे त्यांच्या सहवासात राहणे. खर्‍या अर्थाने सत्संग म्हणजे त्या सर्व गोष्टी ज्या आपण सद्गुरूंच्या सान्निध्यात करतो.

ह्याचे स्वरूप मंत्रजप, भजन, प्रवचन किंवा ध्यान असू शकते. संतांच्या उपस्थितीत जे काही केले जाते तो सत्संग आहे. आपण आपल्या सद्गुरूंपासून शारीरिकदृष्ट्या दूर असल्याने, आपण शक्तीस्वरूप(सूक्ष्म स्वरूप) रूपामध्ये त्यांची प्रार्थना करतो. या विश्वासाने आपण आपल्या गुरु परंपरेने सांगितल्याप्रमाणे जप, आरती अनुष्ठान आणि पुजा करतो. याद्वारे आपल्याला सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात, जे आपले शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करतात आणि आपल्याला सकारात्मक दैवी ऊर्जा प्राप्त होते जी आपण आपल्या आचरणात सूक्ष्म रूपात नक्कीच अनुभवतो.

मंत्रजप ही बहुआयामी प्रक्रिया आहे. उच्चार करण्यापूर्वी आपण मंत्र मनात तयार करतो. त्यानंतर आपण ते गातो किंवा प्रत्यक्ष स्वरूपात उच्चारतो. त्यानंतर आपण तेच मंत्र ऐकतो जे आपण आणि इतर गातो. मंत्र हा शब्द किंवा अक्षरांचा साधा संयोग नाही. आपले सद्गुरू मंत्रातले शब्द स्वतःच्या ऊर्जेने प्रभावित करतात. म्हणूनच अशा कोणत्याही मंत्राचा जप करू नये. तो मंत्र सद्गुरूंकडून मिळाल्यावरच नामजप फलदायी होतो.

नामजपाचा 3 प्रकारे परिणाम होतो. पहिले मनात, दुसरे जेव्हा ते आपल्या घशातून आणि तोंडातून वाहते आणि तिसरे जेव्हा आपण कानांनी ऐकतो. आपल्या शरीरात मंत्राच्या या सतत हालचालीचा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो. हार्मोनिअम, तबला, ढोलक, झांज याने गायन करणे उत्तम. हे श्री दत्त प्रभूंना अत्यंत प्रिय आहे. श्री दत्त हे भगवान ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे संयुक्त अवतार आहेत.

आपल्याला कोणाचे लक्ष वेधायचे आहे म्हणून आपण मोठ्या आवाजात जप करत नाही . पण मोठ्याने जप केल्याने, त्या आवारातील प्रत्येकजण, मग तो मनुष्य असो वा वृक्ष, वनस्पती, पक्षी किंवा प्राणी, मंत्राच्या आवाजाने प्रभावित होतो. त्यामुळे संपूर्ण वातावरण शुद्ध आणि उत्साही बनते. यामुळेच आपली मंदिरे, आश्रम आणि सर्व धार्मिक स्थळे अध्यात्मिक दृष्ट्या उत्साही आहेत.

3M+

Subscriber

1.2M+

Follower

6M+

Follower

1M+

Follower